विशेष प्रतिनिधी
Ahmedabad News : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला AI171 विमान अपघात आता केवळ तांत्रिक बिघाड नसून एक पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय अधिकच बळावत आहे. कारण, जे घडलं ते फक्त अपघात म्हणता येणार नाही हे एक विचारपूर्वक घडवलेलं कारस्थान असण्याची शक्यता तांत्रिक तपशीलांमधून पुढे येत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. Ahmedabad Plane Crash
शुक्रवारी दुपारी एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं AI171 विमान टेकऑफ करताच फक्त 625 फूट उंचीवर असताना अचानक दोन्ही इंजिन बंद पडली. काही सेकंदांतच विमान धडधडत कोसळलं आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. इतक्या कमी वेळात दोन्ही इंजिन बंद होणं हे सामान्य तांत्रिक अपयश नसून नियोजित हस्तक्षेप असल्याचा संशय आता गडद होत असल्याचे म्हटले जात आहे
विमानात 127,000 लिटर इंधन भरलेलं होतं. उड्डाणाची परवानगी PDTC (Pre-Departure Technical Clearance) देण्यात आली होती. पायलट्सही टेकऑफपूर्वी विमानात होते. विमानाने टेकऑफ केल्यानंतर ३०-४० सेकंदात दोन्ही इंजिन बंद पडली. विमान अंदाजे ६००-६५० फूट उंचीवर पोहोचलेलं होते त्यावेळी हे सगळे घडले.
याबाबत काही तज्ज्ञ असे म्हणतात की जर मुख्य इंधन पुरवठा व्हॉल्व्ह (Main Fuel Supply Valve) बंद झाला तर इंजिन्समध्ये असलेलं उरलेलं इंधन फक्त ३० सेकंद पुरतं. हाच वेळ AI171 ने घेतला. याचा अर्थ असा की, मुख्य फ्युएल सप्लाय व्हॉल्व्ह बंद केला गेला होता आणि तो व्हॉल्व्ह फक्त ग्राउंड टेक्निकल टीमच्या आवाक्यात असतो.
ही सर्व माहिती पाहता, पायलट्सकडे त्या व्हॉल्व्हशी छेडछाड करण्याचा अधिकार नसतो. त्याची तपासणी टेकऑफपूर्वी ग्राउंड स्टाफद्वारे केली जाते. मग प्रश्न निर्माण होतो हा व्हॉल्व्ह कोणी आणि का बंद केला?
दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर विमान झपाट्याने गमावली आणि जमिनीवर आदळताच स्फोट झाला. अत्यंत दाहक आगीमुळे विमान पूर्णतः जळून खाक झालं. अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेकांचे अवशेषही ओळखू येणं शक्य नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
जर हे खरोखरच तांत्रिक चूक नसून सुनियोजित घातपात असेल, तर कोण जबाबदार?
या घटनेची सर्वोच्च स्तरावर चौकशी होणं आवश्यक आहे. केवळ अपघात म्हणून फाईल बंद करणं ही नागरिकांच्या सुरक्षेशी प्रतारणा ठरेल, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash or Sabotage? Both Engines Failed, Aircraft Went Down at Just 625 Feet What Really Happened?
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी