विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली; मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून अडचणीत सापडले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचे शौर्य जगासमोर मांडले. मात्र या महिला अधिकाऱ्यांवर आता देशातील नेत्यांकडून वादग्रस्त टिप्पणी होताना दिसत आहे.
राम गोपाल यादव यांनी तर थेट सैन्याची जात काढली. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या ब्रीफिंगमध्ये कर्नल सोफिया कुरेशींसोबत उपस्थित असलेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग या हरियाणाची जाटव आहेत, ती आहे. पण भाजपाने व्योमिका सिंग यांना राजपूत असल्याने काहीही म्हटले नाही.
मात्र भाजपाच्या मंत्र्यांनी कर्नल सोफिया कुरेशीला मुस्लिम असल्याने शिवीगाळ केली. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई कारवाई करणारे एअर मार्शल अवधेश कुमार भारती यादव हे आहेत. एक मुस्लिम, दुसरा जाटव आणि तिसरा यादव, तिघेही पीडीए (मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक) चे आहेत. हे संपूर्ण युद्ध फक्त पीडीएनेच लढले. भाजपा कोणत्या आधारावर याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न राम गोपाल यादव यांनी उपस्थित केला.
भाजपा नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सीमेवर युद्ध लढण्यासाठी गेले होते का? भाजपा नेत्यांची मुले युद्ध लढण्यासाठी सीमेवर गेली होती का? जर असे नसेल तर फक्त एकच पक्ष त्याचे श्रेय का घेण्याचा प्रयत्न करत आहे? असे प्रश्न उपस्थित करत राम गोपाल म्हणाले की, कर्नल सोफिया कुरेशी यांना त्यांच्या मंत्र्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे उच्च न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले, असे म्हणत राम गोपाल यादव यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
Akhilesh Yadav’s uncle Ramgopal Yadav made a controversial statement about Wing Commander Vyomika Singh
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?