विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीर, लडाखचे उपराज्यपाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम सरकारचा प्रतिनिधी सहभागी झाला होता.
या बैठकीत शहा म्हणाले, “पहलगाम येथे २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला होता.हा संकल्प पूर्ण झाला आहे.
शहा यांनी सीमावर्ती राज्यांतील मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आवश्यक सेवा उदा. रुग्णालये, अग्निशमन दल, औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी सर्व तयारी ठेवण्याचे आदेश दिले.
सर्व राज्यांनी मॉक ड्रिलसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयारी पूर्ण ठेवावी. आपत्ती निवारण दल, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड्स आणि एनसीसी यांना सतर्क ठेवावे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा,असेही शहा यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासन, सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये समन्वय अधिक बळकट करण्याचे प्रयत्न व्हावेत,” अशी सूचना देखील त्यांनी केली.
Amit Shah holds security review meeting after Operation Sindoor
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत