विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताविरुद्ध लष्करीदृष्ट्या पराभूत झाल्यानंतर खोट्या बातम्यांच्या माध्यमातून विजयाचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. या अफवांना मूळ स्वरूप दिलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ब्लूमबर्ग, रॉयटर्स, आणि न्यू यॉर्क टाइम्ससारख्या डाव्या विचारसरणीच्या संस्थांनी भारतद्वेष्टी प्रपोगंडा पत्रकारिता सुरू केली आहे.
१३ मे रोजी ब्लूमबर्गने “Chinese Weapons Gain Credibility After Pakistan-India Conflict” या शीर्षकाने एक लेख प्रसिद्ध केला. त्यात पाकिस्तानने भारताचे पाच फायटर जेट्स पाडल्याचा खोटा दावा केला गेला. फ्रेंच-निर्मित राफेल विमानांचाही समावेश होता. लेखात याचा कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा उपग्रह प्रतिमा पुरवण्यात आल्या नाहीत. या लेखाचे मूळ लेखक दोन चिनी पत्रकार जोश झियाओ आणि यियान ली होते. नंतर भारतीय नाव (सुधी रंजन सेन) सामील करून लेखाला विश्वसनीयता देण्याचा प्रयत्न केला गेला.
दुसरीकडे, न्यू यॉर्क टाइम्सने आधी पाकिस्तानचे दावे थेट उचलून मांडले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने ५ भारतीय विमानं पाडलीत. त्यात राफेल, मिग-२९, आणि सुखोई-३० चा समावेश आहे. पण यामागे कोणताही प्रत्यक्ष पुरावा, ना व्हिडिओ, ना प्रतिमा. केवळ एका ‘तज्ज्ञा’चा अंदाज दिला गेला.
मात्र जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी तळ व लष्करी ठिकाणांवर अचूक मिसाईल व ड्रोन हल्ले केल्याचे उपग्रह चित्रांसह पुरावे सादर केले तेव्हा न्यू यॉर्क टाइम्सने आपली भूमिका थोडी बदलली. १४ मे रोजी त्यांनी “India and Pakistan Talked Big, But Satellite Imagery Shows Limited Damage” असे म्हणत, भारतानेच पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना सर्वाधिक हानी पोहोचवली असल्याचे नमूद केले. पण तरीही भारताच्या यशाला कमी महत्त्व दिले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वापरकर्त्यांनी ब्लूमबर्ग, NYT आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांची “प्रोपगंडा पत्रकारिता” म्हणून जोरदार खिल्ली उडवली आहे. भारताचे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानातील दहशतवादी तळं, ड्रोन तळं, रडार सिस्टम्स आणि शस्त्रसाठ्यावर झालेली अचूक कारवाई होती. त्याचे पुरावे आजही उपग्रह चित्रांतून स्पष्ट दिसतात. त्याविरुद्ध पाकिस्तान आणि चीनच्या कथनांमध्ये ना तथ्य, ना ठोस आधार, केवळ अपप्रचार आहे.
Anti-India propaganda journalism by international media, only a game of rumors instead of evidence after Operation Sindoor
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?