Rekha Gupta : दिल्लीतील प्रदूषणावर कृत्रिम पावसाचा उपाय; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा

Rekha Gupta : दिल्लीतील प्रदूषणावर कृत्रिम पावसाचा उपाय; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा

Rekha Gupta

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : Rekha Gupta  राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कृत्रिम पावसाची प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. “सरकार प्रदूषण रोखण्यासाठी सक्रियपणे कृत्रिम पावसावर काम करत आहे. भारतीय हवामान विभागाकडून अनुकूल ढग आणि आर्द्रतेची परवानगी मिळाल्यानंतर हा उपक्रम सुरू केला जाईल,” असे मुख्यमंत्री गुप्ता यांनी सांगितले.Rekha Gupta

मुख्यमंत्री गुप्ता यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. “२०२७ पर्यंत १० हजार इलेक्ट्रिक बसेस दिल्लीमध्ये तैनात करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि अर्ध-सरकारी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.Rekha Gupta

दरम्यान, दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनीही कृत्रिम पावसासाठी ढग बीजारोपण (Cloud Seeding) योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “ढग असतील तेव्हाच बीजारोपण शक्य आहे. आधी ढग यायला हवेत आणि मगच कृत्रिम पाऊस पाडता येतो.Rekha Gupta



मंगळवारी सकाळी दिल्ली दाट धुक्याच्या पडद्यात झाकोळली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दुपारी ४ वाजेपर्यंत दिल्लीचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ३५१ इतका होता, जो ‘अतिशय खराब’ श्रेणीत मोडतो.

सिरसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर प्रदूषण केवळ ११ पॉइंटने वाढले आहे. “२०२० मध्ये फटाके चालू असतानाही पीएम २.५ पातळी दिवाळीपूर्वी ४१४ होती आणि नंतर ४३५ झाली. २०२१ मध्ये ती ८० पॉइंटने वाढली. २०२४ मध्ये फटाके बंद असतानाही एएक्यूआय ३२८ वरून ३६० झाला. यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि दिल्ली सरकारच्या विनंतीवरून हरित फटाके वापरण्याची परवानगी दिली गेली. दिवाळीपूर्वी एएक्यूआय ३४५ होता, तर नंतर ३५६ झाला, म्हणजे केवळ ११ पॉइंटची वाढ झाली,” असे सिरसा यांनी सांगितले.

सरकारने नागरिकांना प्रदूषण नियंत्रणात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काही दिवसांत प्रदूषण पातळी आणखी वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाने कृत्रिम पाऊस आणि हरित वाहतूक उपक्रमांना गती देण्याची तयारी सुरू केली आहे.

Artificial rain to be a solution to pollution in Delhi; Chief Minister Rekha Gupta announces

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023