विशेष प्रतिनिधी
सहारनपूर (उत्तर प्रदेश) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निषेध म्हणून हिंदू संघटनांनी रस्त्यावर चिकटवलेला पाकिस्तानचा झेंडा हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११वीत शिकणाऱ्या एका मुस्लिम विद्यार्थिनीला शाळेतून कमी करण्यात आले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला. Pakistani flag
सोमवारी (२९ एप्रिल) पहलगाम हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर क्रांती सेनेसह काही हिंदू संघटनांनी गंगोह नगरमधील सहारनपूर बसस्थानक चौकात रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा चिकटवला होता. याच ठिकाणी ही विद्यार्थिनी आपल्या स्कूटरवरून जात असताना तिने रस्त्याच्या मध्यभागी असलेला झेंडा पाहून त्याला काढण्याचा प्रयत्न केला. झेंडा चांगला चिकटवलेला असल्याने तो निघत नाही हे लक्षात येताच तिने प्रयत्न सोडून स्कूटरवर परतली. मात्र, याचा व्हिडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडीओमुळे परिसरात खळबळ माजली. विद्यार्थिनीची शाळा सिल्व्हर ओक पब्लिक स्कूल असल्याचे ओळखून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, विशेषतः क्रांती सेनेचे सदस्य शाळेत पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तिला तात्काळ शाळेतून कमी करण्याची मागणी केली. क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज रोहिला यांनी शाळेच्या प्राचार्यांना निवेदन दिले आणि या कृतीला देशद्रोह ठरवत कारवाईची मागणी केली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थिनीला तत्काळ शाळेतून कमी केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी तिच्या कृतीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीचा हेतू झेंडा हटवण्याचा नव्हता, तर तिचा पेन रस्त्यावर पडल्यामुळे ती तो शोधण्यासाठी गेली होती. योगायोगाने तो पेन झेंड्याजवळ पडल्यामुळे तिची कृती झेंडा हटवण्यासारखी भासली.या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण असून, सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत.
गंगोह जिला सहारनपुर
पहलगाम कांड के विरोध में सड़क पर पाकिस्तानी झंडा चिपका था
11वीं क्लास में पढ़ने वाली एक मुस्लिम छात्रा अपनी स्कूटी रोक कर सड़क पर चिपके पाकिस्तानी झंडे को हटाने के लिए कोशिश की हालांकि झंडा चिपकाया गया था इसलिए वह उसे उखाड़ नहीं सकी
सर @saharanpurpol… pic.twitter.com/eL4yhUQP16
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) May 1, 2025
Attempt to remove Pakistani flag from road, class 11 student expelled from school, alleged as anti-national
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती