विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : Atul Kulkarni मी माझं म्हणणं मांडलं आहे. माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.Atul Kulkarni
काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकातून या विषयावरील ही माझी शेवटची पोस्ट असे म्हणत अतुल कुलकर्णी यांनी ही पाेस्ट केली आहे. 22 एप्रिल राेजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरींनाही दोषी ठरवत काश्मिरमधील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता.
या दौऱ्यादरम्यान आता श्रीनगरमधील लाल चौकातून अतुल कुलकर्णी यांनी देशवासियांना देशवासियांना संदेश देताना म्हटले आहे की, माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो. काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकातून या विषयावरील ही माझी शेवटची पोस्ट.
मैंने मेरी बात रखी है।
पसंद आई हो, तो अमल करें।
ना आई हो, तो भूल जाएँ।२६ जानों को श्रद्धांजलि…
अनगिनत लोगों को सांत्वना…लाल चौक श्रीनगर से, कश्मीर से और इस विषयपर, मेरी आख़री पोस्ट 🙏🏻 #ChaloKashmir #Feet_in_Kashmir #Kashmiriyat #love_compassion #DefeatTerror pic.twitter.com/u7QTiGrkof
— atul kulkarni (@atul_kulkarni) April 29, 2025
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मिरच्या दौऱ्यावर गेले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावं, असं आवाहन त्यांनी केलं. आपण फक्त सोशल मीडियावर याविषयी लिहितो. कुठेतरी काहीतरी बोलतो. पण यासाठी मी काय कृती करु शकतो. माझ्या वाचण्यात आलं की इथे येण्यासाठीचं ९० % बूकींग रद्द झालं. सध्या हा पर्यटनाचा चांगला काळ आहे. काश्मीरमधील जे लोक आहेत त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. पर्यटनाचं फक्त पैशांपुरतं महत्व नाही. पर्यटनात लोक एकमेकांशी जोडले जातात, असे त्यांनी इथे आल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते.
Atul Kulkarni’s message from Kashmir, if you like the opinion, implement it, if not, forget it…
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती