विशेष प्रतिनिधी
दुर्गापूर : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली असून, या घटनेने राजकीय वादळ माजवले आहे. पीडितेच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले, “आज बंगाल औरंगजेबाच्या राजवटीसारखा झाला आहे, जिथे महिला सुरक्षित नाहीत. Durgapur gang rape case
दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यात “महिलांच्या सुरक्षिततेसाठी दुसऱ्या पुनर्जागरणाची आवश्यकता आहे” असे म्हटले आहे.
पाचही आरोपी अटकेत घेतल्याची माहिती आसनसोल-दुर्गापूर पोलीस आयुक्त सुनील कुमार चौधरी यांनी दिली. “आज सकाळी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपास जलद गतीने सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
ही घटना १० ऑक्टोबरच्या रात्री घडली, जेव्हा ओडिशातून वैद्यकीय शिक्षणासाठी दुर्गापूरमध्ये आलेल्या दुसऱ्या वर्षातील एमबीबीएस विद्यार्थिनीवर पाच जणांनी जंगल परिसरात ओढून नेऊन बलात्कार केला. या आरोपींची ओळख अपु बावरी, फिरदोस शेख, शेख रियाजुद्दीन आणि त्यांच्या दोन साथीदारां अशी करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले,
“माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. बंगालमध्ये आता भीतीचे साम्राज्य आहे. आम्हाला वाटते की आमच्या मुलीला येथे ठेवणे म्हणजे तिच्या आयुष्याशी खेळणे आहे.”
या प्रकरणाने राजकीय वादळ माजवले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC), विरोधी भाजप (BJP) आणि पीडितेच्या मूळ राज्यातील ओडिशा सरकार यांनी या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.
विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या “मुलींनी रात्री बाहेर पडू नये” या वक्तव्यावर टीका करत त्यांना “पीडितेला दोष देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा लाजिरवाणा चेहरा” असे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) विद्यार्थिनीला सर्व प्रकारचे शैक्षणिक आणि संस्थात्मक समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने राज्य सरकारकडे त्वरित कारवाई आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल बोस म्हणाले, “बंगाल कधीकाळी बुद्धिजीवींचं आणि सामाजिक सुधारकांचं केंद्र होतं, पण आज महिलांच्या सन्मानासाठी दुसऱ्या पुनर्जागरणाची गरज निर्माण झाली आहे.”
Aurangzeb’s rule in Bengal! Five arrested in Durgapur gang rape case; Victim’s father furious
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा