विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : Akhtar Mengal भारताने कठाेर कारवाईचा इशारा दिल्यावर पाकिस्तानमध्ये घबराट उडाली आहे. मात्र, तरीही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भारताला उत्तर देण्याच्या वल्गना करत आहेत. त्यांना पाकिस्तानी नेत्यानेच उत्तर दिले असून १९७१ साली झालेला लाजीरवाणा पराभव विसरू नका असे त्यांनी म्हटले आहे.Akhtar Mengal
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच भारताने आक्रमक कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी लष्करात घबराट पसरली आहे . दुसऱ्या बाजुलाही अंतर्गत बंडखोरांनीही पाकिस्तानच्या लष्कराचा जेरीस आणलं आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशांतर्गत बंडखोरांना इशारा देताना बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुटमणी असून, पुढच्या १० पिढ्या सुद्धा त्याला वेगळा करू शकणार नाहीत, असे म्हटले होते.
त्यावर बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत. पाकिस्तानी लष्कर बलुचींना १० पिढ्यांपर्यंत शिक्षा देण्याचा इशारा देत आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या किती पिढ्या बंगाल्यांकडून झालेल्या त्या ऐतिहासिक पराभवाला आठवणीत ठेवत आहेत?.
बलूच जनता मागच्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहे. आम्ही असे लोक आहोत जे तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक अत्याचाराची आठवण ठेवणारे आहोत. तसेच तुमच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा इशाराही मेंगल यांनी दिला.
Baloch leader shames Pakistan Army, advises not to forget 1971 defeat
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा