विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात आम आदमी पक्षाला (आप) मोठा हादरा बसला आहे. पक्षातील असंतोष अखेर उघडपणे समोर आला असून १५ नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे नगरसेवक हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय गटाची स्थापना करत असून, या नव्या पक्षाचं नाव ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ (Indraprastha Vikas Paksha) असे असणार आहे. मुकेश गोयल या नव्या पक्षाचे प्रमुख नेते असतील.
राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमचंद्र गोयल, मुकेश गोयल, दिनेश भारद्वाज, रुनाक्षी शर्मा, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी यादव, अशोक पांडे, मनीषा, राजेश कुमार लाडी, सुमन अनिल राणा, देवेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
या नगरसेवकांनी स्पष्ट सांगितले की, ‘आप’चा पक्ष म्हणून आताचा कारभार एककल्ली झाला आहे. कार्यकर्त्यांच्या मताला किंमत राहिलेली नाही. त्यामुळे हा स्वतंत्र राजकीय गट निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुकेश गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आज आमच्यासोबत १५ नगरसेवक आहेत, जे नवीन ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’चा भाग बनतील. हा पक्ष दिल्लीच्या विकासाला प्राधान्य देईल आणि स्थानिक प्रश्नांवर केंद्रित राजकारण करेल.
हेमचंद्र गोयल आणि मुकेश गोयल हे पूर्वी काँग्रेस पक्षात सक्रिय होते. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. आदर्श नगर विधानसभा मतदारसंघातून मुकेश गोयल यांना ‘आप’ने निवडणूक उमेदवारीही दिली होती.
दरम्यान, गेल्या महिन्यात पार पडलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचे राजा इक्बाल सिंह महापौर म्हणून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मनदीप सिंग यांचा पराभव केला होता. या निवडणुकीवर ‘आप’ने बहिष्कार टाकला होता. त्यावरून पक्षात नाराजी वाढल्याचं बोललं जातं.
राजकीय वर्तुळात हे ‘आप’साठी एक गंभीर राजकीय संकट आणि पक्षातील अंतर्गत असंतोषाचे प्रतिबिंब मानले जात आहे. अनेक वरिष्ठ नेते आणि नगरसेवक खुलेपणाने पक्षविरोधी भूमिका घेत आहेत, जे आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आप’साठी अडचणीचे ठरू शकते. Indraprastha Vikas Paksha
Big blow to AAP in Delhi; 15 corporators resign, Indraprastha Vikas Paksha announced
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?