विशेष प्रतिनिधी
नारायणपूर : Chhattisgarh छत्तीसगडमधील अबुझमाड जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दोन शीर्षस्थ माओवादी नेत्यांचा खात्मा केला. कोसा ऊर्फ कादरी सत्यनारायण रेड्डी आणि राजू ऊर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी अशी ठार झालेल्या केंद्रीय समिती सदस्यांची नावे असून हे दोघेही तेलंगणातील करीमनगर येथील रहिवासी होते.Chhattisgarh
कोसा हा बस्तरमधील माओवादी चळवळीचा संस्थापक मानला जात होता. त्याच्यावर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. तर राजूवर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. या दोघांच्या खात्म्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.Chhattisgarh
कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी एके-४७ रायफल्स, स्फोटके, माओवादी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू जप्त केल्या. ही चकमक छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर घडली असून याला निर्णायक स्वरूपाचे यश मानले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोहिमेचे कौतुक करत म्हटले की, “सुरक्षा दल माओवादींचा कणा मोडत आहेत”.या कारवाईमुळे छत्तीसगडमधील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून बस्तरमधील दहशतवादविरोधी मोहिमेला बळ मिळणार आहे.
Big blow to Maoists in Chhattisgarh, two central committee leaders killed in Abujmad forest
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















