विशेष प्रतिनिधी
भोपाल : Madhya Pradesh कर्नल सोफिया कुरेशी वक्तव्य प्रकरणानंतर मध्य पदेशातील भाजप नेत्यांना भाषण कौशल्याचे धडे दिले जाणार आहेत.भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशच्या भोपाल येथे आपल्या नेत्यांसाठी जूनमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये सार्वजनिक भाषणे सुधारण्यावर भर दिला जाणार असून, नेत्यांनी बोलताना चुका टाळाव्यात यासाठी मार्गदर्शन केले जाईल. ही योजना जरी दोन मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर जाहीर झाली असली, तरी भाजपने याचा संबंध त्या प्रकरणांशी असलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.Madhya Pradesh
राज्य भाजप प्रवक्त्याने सांगितले की, “हे प्रशिक्षण शिबिर पूर्वनियोजित असून, भाजपच्या नियमित कार्यक्रमाचा एक भाग आहे. याचा सध्याच्या वादांशी काहीही संबंध नाही.” शिबिराचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.
भाजपचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी माध्यमांना माहिती देणाऱ्या महिला सैन्य अधिकाऱ्यांवर अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना “आतंकवाद्यांची बहीण” म्हटले होते. या वक्तव्यावर विरोधक आणि नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. यामुळे उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
त्याचवेळी, उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी देखील भारतीय लष्कर आणि सैनिक “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत” असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. नंतर त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला.
भाजपचे वरिष्ठ नेते म्हणाले की, “सेहोर जिल्ह्यात 2023 च्या निवडणुकांपूर्वीही अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता. हे शिबिर म्हणजे पक्षाच्या विचारधारेची माहिती देणे आणि जनतेशी प्रभावी संवाद साधण्याचे प्रशिक्षण देणे हा उद्देश आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले होते. त्याआधी २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतातील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. भारताने प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर, नियंत्रण केंद्रांवर आणि रडार यंत्रणांवर जोरदार हल्ले केले होते.
BJP leaders in Madhya Pradesh get lessons in public speaking skills after Colonel Sophia Qureshi statement case
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर