Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा

Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा

tiranga yatra

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात राबविलेले भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले पाकिस्तानचे कंबरडे यामुळे माेडले आहे. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून तिंरगा यात्रा (Tiranga Yatra) काढली जाणार आहे.

१३ मे ते २३ मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. १० दिवस ही यात्रा चालणार आहे. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भाजप जनतेपर्यंत ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पोहोचवणार आहे. भारताने देशाचा स्वाभिमान कशापद्धतीने बळकट केला, असा संदेश दिला जाणार आहे. तिरंगा यात्रा आयोजनाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेतते संबित पात्रा, विनोद तावडे, तरुण चुग या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागात काढल्या जाणाऱ्या या तिरंगा यात्रांचे नेतृत्व भाजपचे वरिष्ठ नेते करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश हे राजकीय इच्छा शक्तीचे यश असल्याचे भाजपने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरची जी उद्दिष्टे होती, ती शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. वाचा >> तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही,

भाजपचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भारताने दहशतवाद्यांविरोधात लढाई लढली आणि लष्कराच्या साहसाने हे ऑपरेशन यशस्वी ठरले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल विमानांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे आपले वैमानिकही सुरक्षित परत आले आहेत.

BJP to take out Tiranga Yatra across the country to celebrate the success of Operation Sindoor

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023