राज्यसभेत भाजपाची ताकद वाढली; शंभरी पार करत १०२ खासदारांचे बळ

राज्यसभेत भाजपाची ताकद वाढली; शंभरी पार करत १०२ खासदारांचे बळ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी सभापती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याआधीच भाजपाची राज्यसभेत आपली ताकद वाढवली आहे. एप्रिल २०२२ नंतर प्रथमच भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ १०० च्या वर पोहोचले आहे. Rajya Sabha

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच चार प्रतिष्ठित व्यक्तींची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. यामध्ये प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासकार मिनाक्षी जैन यांचा समावेश आहे. या चार जणांपैकी तीन निकम, श्रृंगला आणि सदानंदन मास्टर हे भाजपाशी संबंधित असल्यामुळे पक्षाची अधिकृत सदस्य संख्या आता १०२ इतकी झाली आहे.


आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


मार्च २०२२ मध्येही १३ राज्यसभा जागांवरील निवडणुकांनंतर भाजपाचे १०१ खासदार निवडून आले होते. त्यावेळीही पक्षाने शंभरी पार केली होती. याआधी १९८८ आणि १९९० साली काँग्रेस पक्षाची सदस्यसंख्या राज्यसभेत १०० च्या वर गेली होती.

सध्या राज्यसभेत एकूण २४० सदस्य आहेत. यामध्ये १२ नामनिर्देशित सदस्य असून ५ जागा रिक्त आहेत. भाजपाच्या एकूण १०२ सदस्यांपैकी ५ नामनिर्देशित खासदार आहेत. त्याशिवाय मित्रपक्ष आणि अपक्षांसह भाजप नेतृत्वाखालील युतीकडे सुमारे १३४ खासदारांचे समर्थन आहे. त्यामुळे १२१ च्या बहुमत आकड्यापेक्षा भाजपकडे स्पष्ट वर्चस्व आहे.

उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील. २६/११ मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी अनेक खटले लढवले असून २०१६ साली त्यांना पद्मश्री मिळाली. २०२४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून निवडणूकही लढवली होती.

हर्षवर्धन श्रृंगला २०२० ते २०२२ दरम्यान भारताचे परराष्ट्र सचिव होते. २०२३ मधील G20 परिषदेसाठी प्रमुख समन्वयक होते. तसेच अमेरिका व बांगलादेशात भारताचे राजनैतिक प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे.

सी. सदानंदन मास्टर केरळमधील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक आहेत. १९९४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यावर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे पाय कापले, असा आरोप त्यांनी केला होता. ते आजही सक्रिय भाजप कार्यकर्ते आहेत.

BJP’s strength in Rajya Sabha increased; strength of 102 MPs crosses 100 mark

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023