Disha Patani दिशा पाटणीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन्ही शटर गाझियाबादमध्ये पोलिस एनकाउंटरमध्ये ठार

Disha Patani दिशा पाटणीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन्ही शटर गाझियाबादमध्ये पोलिस एनकाउंटरमध्ये ठार

विशेष प्रतिनिधी

बरेली : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेलीतील घरावर १२ सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी असलेल्या दोन शूटरांना पोलिसांनी गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत ठार केले. रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण अशी त्यांची नावे असून दोघेही रोहित गोडारा–गोल्डी बरार टोळीचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे प्रलंबित होते. Disha Patani

दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश विशेष कार्य बल (STF) आणि हरियाणा STF यांनी संयुक्त कारवाई करताना या आरोपींना गाझियाबादमध्ये शोधून काढले. हे दोघेही त्याच मोटारसायकलवर फिरताना दिसले, जी दिशा पाटणीच्या घरावरील हल्ल्यात वापरली गेली होती. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात झालेल्या कारवाईत दोघेही गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Disha Patani

१२ सप्टेंबरच्या पहाटे ३.३० वाजता सिव्हिल लाईन्स, बरेली येथील घरात दिशा पाटणीचे वडील, निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश पाटणी, कुत्र्यांच्या भुंकण्याने जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता दोन युवक मोटारसायकलवर उभे होते. त्यांनी विचारले, “कोण आहात?” त्यावर एकाने “गोळी घाल” असे ओरडून थेट फायरिंग केली. मात्र जगदीश पाटणी यांनी वेळीच खांबामागे आसरा घेतल्याने ते थोडक्यात बचावले.

गोळीबारात आरोपींनी घराकडे व हवेत अशा मिळून अनेक राऊंड झाडले आणि पसार झाले. घटनेनंतर गोल्डी बरार टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पाटणी कुटुंबाने संत प्रेमानंद महाराज व अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अखेर गाझियाबाद येथे झालेल्या संयुक्त कारवाईत दोन्ही शूटरना ठार करण्यात आले.

Both the shooters in the firing case at Disha Patani’s house were killed in a police encounter in Ghaziabad

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023