विशेष प्रतिनिधी
वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल अक्षरशः मधोमध तुटून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघात झाला तेव्हा वाहने पूल ओलांडत होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी एकूण पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या टोकाला एक टँकर अडकला होता. अग्निशमन दलाच्या तीन पथकांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
पूल कोसळल्यामुळे दक्षिण गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, तापी आणि वलसाड या शहरांमधून सौराष्ट्रला पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागेल. आता यासाठी अहमदाबादमार्गे लांब मार्गाने जावे लागेल. ४५ वर्षे जुना हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. पूल तुटला तेव्हा अनेक वाहने त्यावरून जात होती. दोन ट्रक आणि एक बोलेरोसह चार वाहने नदीत पडली. एक दुचाकीस्वारही नदीत पडला. नंतर स्थानिक लोकांनी त्याला वाचवले.
पूल कोसळल्यानंतर, जवळच्या भागातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्यात एसडीआरएफला मदत केली. स्थानिक लोकांनी एसडीआरएफसोबत मिळून नदीतून वाहने बाहेर काढली. या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ६ जणांना वडोदरा येथील पद्रा रुग्णालयात आणि २ जणांना सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली.
सकाळी 7:30 वाजण्याच्या ही घटना घडली. सकाळी शाळेची वाहनं, इतर वाहनांची ये-जा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टाळला.
Bridge over Mahisagar river in Vadodara breaks in the middle, many vehicles fall into the water, nine people die
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी