विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Bushra Ansari threatens Javed Akhtar मरायला तुमचे दोन तास उरले आहेत, तरीही तुम्ही अशा फालतू गोष्टी करताय? नसीरुद्दीन शाह गप्प बसलेत ना? तुम्ही पण तसंच करा , अशी धमकी पाकिस्तानी अभिनेती बुश्रा अन्सारी हिने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जावेद अख्तर यांना दिली आहे.Bushra Ansari threatens Javed Akhtar
जावेद अख्तर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत भारत सरकारला आवाहन केले होते की, “सीमेवर काही फटाके उडवून उपयोग नाही, ठोस पावलं उचला. त्या देशाच्या सेनाप्रमुखाच्या वक्तव्यांना कोणीही शहाणा माणूस गंभीरतेने घेत नाही. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे ही अतिरेक्यांच्या अजेंडाला बळकटी देणारी गोष्ट ठरेल. पण सध्या यावर चर्चा करण्याचा योग्य काळ नाही. भविष्यात परिस्थिती सुधारेल, तेव्हा विचार करता येईल.
या व्हिडीओमध्ये बुश्रा हिने जावेद अख्तर यांच्यावर वैयक्तिक टीका करत म्हटलं की, “मुंबईमध्ये घर भाड्याने मिळत नव्हतं, त्यामुळे पब्लिसिटीसाठी काहीही बोलतात.”
२०२३ मध्ये, प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या एका महोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दहशतवादावर थेट टीका केली होती.मुंबईवरील २६/११ हल्ल्याचे दोषी आजही मोकाट फिरत आहेत, आणि भारतीयांनी पाकिस्तानी जनतेबद्दल सहानुभूती बाळगावी, ही अपेक्षा अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले होते.
एकमेकांन दोष देऊन काही होणार नाही. प्रश्न सुटणार नाहीत. जो गरम है फिजा, वो कम होनी चाहिए. हम तो बम्बईये लोग हैं. हमने देखा वहां कैसे हमला हुआ था. वो लोग नॉर्वे से तो नहीं आये थे ना, इजिप्ट से आये थे? वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं. तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको बुरा नहीं मानना चाहिए.( तापलेले वातावरण शांत होण्याची गरज आहे. मी मुंबईचा आहे आणि आम्ही सर्वांनी पाहिलं की त्या शहरावर कसा हल्ला झाला. ते लोक ना नॉर्वेमधून आले होते, ना इजिप्तमधून. ते आजही तुमच्या देशात मोकळेपणाने फिरत आहेत. त्यामुळे जर एखाद्या भारतीयाच्या मनात त्याबद्दल तक्रार असेल, तर ती समजून घ्यायला हवी, राग मानू नये.) अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या होत्या.
Pakistani actress Bushra Ansari threatens Javed Akhtar, says he has two hours to die, keep quiet like Naseeruddin Shah
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत