विशेष प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्याची घोषणा कंबोडियाने केली आहे. कंबोडियाचे उपपंतप्रधान सन चंथोल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील ताज्या सीमासंघर्षावर ट्रम्प यांनी थेट हस्तक्षेप करून युद्ध थांबवले, याबद्दल कंबोडिया सरकार त्यांचे आभार मानत आहे. Donald Trump
“डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देणे योग्य आहे,” असे चंथोल यांनी फ्नॉम पेन्ह येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारले असता त्यांनी “होय, आम्ही शिफारस करत आहोत,” ठाम उत्तर दिले.
ही शिफारस व्हाईट हाऊसच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव करोलिन लेव्हिट यांनी नुकतीच मागणी केली होती की, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा प्रमुख संघर्ष संपवले असून त्यांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जावा.त्यांनी म्हटले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी थायलंड-कंबोडिया, इस्रायल-इराण, रवांडा-काँगो, भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोव्हो आणि इजिप्त-इथिओपिया यांच्यातील संघर्ष संपवले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील सहा महिन्यांत जवळपास दर महिन्याला एक शांतता करार झाला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची वेळ आली आहे, असे लेव्हिट यांनी सांगितले.
कंबोडिया ट्रम्प यांच्या नोबेल नामांकनासाठी शिफारस करणारा दुसरा देश ठरला आहे. याआधी पाकिस्तान सरकारने जाहीरपणे २०२६ साली ट्रम्प यांचे नामांकन करणार असल्याचे सांगितले होते.
पाकिस्तान सरकारच्या एक्स अकाउंटवरून त्यांनी म्हटले होते की “भारत-पाकिस्तान संघर्षात निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप केल्याबद्दल आणि शांतता प्रस्थापित केल्याबद्दल डोनाल्ड जे. ट्रम्प यांना २०२६ साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येत आहे.”
Cambodia nominates Donald Trump for Nobel Peace Prize for ending conflict with Thailand
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा