विशेष प्रतिनिधी
दरभंगा (बिहार): अमित शाह म्हणाले, “आम्ही अलिनगर येथून २५ वर्षीय मैथिली ठाकूर या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणीला उमेदवारी दिली. पण असे काही लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात किंवा काँग्रेसमध्ये कधी घडू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीवर हल्लाबोल केला आहे. Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील दरभंगा येथे आयोजित सभेत महागठबंधनातील पक्षांवर घराणेशाही आणि पक्षपाताचे राजकारण केल्याचा तीव्र आरोप केला.
अमित शहा म्हणाले, लालूजींना आपला मुलगा मुख्यमंत्री बनवायचा आहे, तर सोनियाजींना राहुल गांधी पंतप्रधान व्हावा असं वाटतं. त्यांना फक्त त्यांच्या मुलांच्या विकासाची चिंता आहे, देशाच्या जनतेच्या नव्हे.”
शाह यांनी सांगितले की, दरभंगा शहराला लवकरच मेट्रो रेल्वे प्रकल्प मिळणार आहे. विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर एआयआयएमएस ,(AIIMS) चे कामही सुरू आहे. त्यांनी दावा केला की, “मोदी सरकारने अतिरेकी संघटना PFI वर बंदी घातली असून, त्याच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले आहे. NDA सरकार असताना त्यांना बाहेर पडू दिले जाणार नाही. पण जर लालू आणि त्यांचे सहकारी सत्तेत आले, तर हे लोक तुरुंगातून बाहेर पडतील.”
अमित शाह यांनी मिथिला प्रदेशातील जनतेशी संवाद साधताना सांगितले की, “माता सीतेसाठी एक भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे, तसेच तिच्या आयुष्यातील प्रमुख स्थळांना ‘राम सर्किट’ शी जोडण्यात येईल.”
या भाषणाद्वारे शाह यांनी एकीकडे महागठबंधनातील घराणेशाहीवर जोरदार हल्ला केला, तर दुसरीकडे तरुण आणि राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची भूमिका अधोरेखित केली.
Can a 25-year-old Maithili be nominated? Amit Shah questions while attacking dynasticism
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















