विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माज कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा Mahendra Singh Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केल आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीनं हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे. ‘
धाेनीने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९फलंदाजांना बाद केले. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे. Mahendra Singh Dhoni
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
महेंद्रसिंह धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फलंदाजीसह विकेट किपिंगमधील खास कामगिरीसह त्याने क्रिकेट वर्तुळात आपला खास ठसा उमटवला. फटकेबाजीसह त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद तर दाखवलीच. याशिवाय मिली सेकंदात स्टंपिंगसह अफलातून कॅचसह त्याने विकेटमागेही धोनी मॅजिक दाखवून दिले आहे.
२००७ च्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने इतिहास रचला होता. त्यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ चॅम्पियन ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला शह देत धोनीनं नवा इतिहास रचला. ही भारतीय क्रिकेटची नवी सुरुवात होती. पुढे त्याने वनडे वर्ल्ड कपसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही संघाला यश मिळवून दिले.
Captain Kul Mahendra Singh Dhoni’s name included in ICC Hall of Fame
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी