विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीजफायर झाला आहे. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे.
दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही. मिल्ट्री कारवाई होणार नाही. जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे. १२ तारखेला पुन्हा एकदा पाकिस्तानशी बोलणं होणार आहे.
दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून या शस्त्रसंधीची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समझोता केला आहे. भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती आणि स्वरूपांप्रती कायमच कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे. ही भूमिका भारत पुढेही कायम ठेवेल, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्याचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते, या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अखेर आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.
Ceasefire finally reached between India and Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित