विशेष प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसने कायमच हिंदू धर्मियांच्या अस्मिता, श्रद्धा व भावनेचा अनादर केला. परंतु यावेळी, महाकुंभमेळा सारख्या पवित्र उत्सवाची, त्यात आस्थेने, श्रद्धेने सहभागी होणाऱ्या कोट्यवधी हिंदूंची, गंगेच्या पवित्रतेची अक्षरशः खिल्ली उडवून या सगळ्यावर कळस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी चढवला आहे, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाकुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाहांवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हिंदूंच्या श्रध्देचा अपमान करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जाहीर निषेध! गंगेत स्नान केल्याने या देशातील गरिबी दूर होईल का? असा निर्बुद्ध पण तेवढाच संतापजनक प्रश्न काँग्रेसच्या या अध्यक्षाने उपस्थित केला आहे. खरगे यांच्या या विधानाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
एका विशिष्ट समुदायाचे काँग्रेसने कायमच लांगुलचालन केले. या देशात बहुसंख्य व सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाने हे शांतपणे सहन केले व स्वीकारले. परंतु, हे करीत असताना हिंदूंच्या आस्थांची खिल्ली उडवण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कोणी दिला? काँग्रेसला हिंदूंची मते हवी असतात, पण मग हिंदूंचा तुम्हाला इतका तिरस्कार का आहे? नेमकी हिंदूंची चूक तरी काय आहे? स्वतंत्र भारताच्या इतिहासात सहा दशकाहून अधिक काळ तुम्हाला सत्तेत बसवलं, ही या देशातील हिंदूंची चूक आहे का? लोकसभेत ९९ का होईना पण खासदार निवडून आणू शकलात त्या हिंदूंच्या भावनांचा आपण सन्मान करू शकत नसू तर किमान खिल्ली उडवून अपमान तरी करू नये, इतकेही भान तुम्हाला का असू नये? हे या हिंदूस्थानातील जनतेला प्रश्न पडले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, एमआयएम आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. कदाचित पालिका निवडणुकीतही ते एमआयएमसोबत आघाडी करतील. बावनकुळे यांनी ठाकरे गटावर आरोप केला की, उद्धव ठाकरे एमआयएमची भूमिका मांडत आहेत आणि त्यांची राजकीय धोरणे हिंदूंविरोधी आहेत.
Chandrasekhar Bawankule rant against Mallikarjun Kharge
महत्वाच्या बातम्या