विशेष प्रतिनिधी
वाराणसी : Narendra Modi कोणत्याही भारतीयाच्या घामातून आणि प्रयत्नांतून तयार झालेली कोणतीही वस्तू म्हणजे स्वदेशी आहे अशी स्वदेशीची व्याख्या करत नागरिकांनी व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले.Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. वाराणसीमधून पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील कार्यक्रमातून स्वदेशीचा नारा दिला. ते म्हणाले, नागरिकांनी मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची शपथ घ्यावी. आपल्या घरात येणारी प्रत्येक नवीन वस्तू स्वदेशी असली पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रत्येक व्यापारी आणि दुकानदाराने केवळ स्वदेशी वस्तू विकण्याची शपथ घ्यावी. ही कृतीच देशाची खरी सेवा असेल. आगामी सणासुदीच्या काळात लोकांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करावा. ही महात्मा गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल.Narendra Modi
नरेंद्र मोदींनी जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणाचा सामना करत असल्याचे अधोरेखित केले. अशा परिस्थितीत, जगभरातील देश आपल्या हितावर लक्ष केंद्रित करत आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आता भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशावेळी भारताने आपल्या आर्थिक हिताबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे आणि लघु उद्योगांचे कल्याण आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे आणि सरकारही या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
Citizens should put the mantra of “Vocal for Local” into practice, Prime Minister Narendra Modi’s Swadeshi appeal
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान