विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी भूमिकेची काँग्रेसला पोटदुखी झाली आहे. आता खासदार असूनही त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांची निमंत्रणे मिळणे बंद झाले आहे. Shashi Tharoor
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. मुरलीधरन यांनी रविवारी पुन्हा एकदा थरूर यांच्यावर सडकून टीका केली. थिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य शशी थरूर यांना “राष्ट्रीय सुरक्षेवरील भूमिकेत बदल होईपर्यंत” पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जोपर्यंत ते आपली भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांना थिरुअनंतपुरममध्ये होणाऱ्या कोणत्याही काँग्रेस कार्यक्रमात बोलावलं जाणार नाही,” असे मुरलीधरन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “ते आमच्यातील नाहीत, त्यामुळे कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच येत नाही.” Shashi Tharoor
गेल्या काही दिवसांत मुरलीधरन यांनी थरूर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. थरूर यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली होती. यावर काँग्रेसमधील काही नेते नाराजी व्यक्त करत आहेत.
कोचीनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना थरूर यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत स्पष्ट केले होते की, “राष्ट्र हा सर्वोच्च आहे आणि पक्ष हे केवळ साधन आहेत. मी माझ्या भूमिकीवर ठाम आहे कारण ती देशाच्या हिताची आहे.”
थरूर पुढे म्हणाले, “जेव्हा आम्ही देशाच्या सुरक्षेसाठी इतर पक्षांबरोबर सहकार्याची भूमिका मांडतो, तेव्हा आम्हालाच पक्षविरोधी ठरवले जाते, आणि हीच मोठी अडचण ठरते.”
थरूर यांच्यावर ही टीका त्यांच्या एका लेखावरूनही करण्यात आली होती. त्यांनी एका मल्याळम दैनिकात आणीबाणीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर मुरलीधरन यांनी “थरूर यांनी जर काँग्रेसमध्ये अडथळे वाटत असतील, तर त्यांनी स्पष्ट राजकीय भूमिका घ्यावी,” असा सल्ला दिला.
याआधीही मुरलीधरन यांनी थरूर यांच्यावर काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा सर्वाधिक पसंतीचा चेहरा असल्याचा सर्वे शेअर केल्याबद्दल टीका केली होती. “थरूर यांनी आधी कोणत्या पक्षाचे आहेत हे ठरवावे,” अशा शब्दांत त्यांनी थरूर यांची कानउघडणी केली होती.
Congress Irked by Shashi Tharoor’s Nationalist Stance; No Invitations to Party Events
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार