ईद-उल-अजहा पोस्टवरून काँग्रेस नेत्या आरफा खानम वादात; हिंदूंच्या भावना दाखवल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी

ईद-उल-अजहा पोस्टवरून काँग्रेस नेत्या आरफा खानम वादात; हिंदूंच्या भावना दाखवल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्याआणि सुप्रीम कोर्टातील वकील असलेल्या आरफा खानम वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या दिवशी त्यांनी X या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये एका मुस्लिम मुलाच्या शेजारी गाय दाखवण्यात आली होती आणि ‘Eid-Ul-Adha Mubarak’ असा संदेश लिहिण्यात आला होता. या चित्रातून गाय कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संदेश सूचित होत असल्याचा आरोप अनेक हिंदू संघटनांनी आणि नेटिझन्सनी केला आहे.

आरफा खानम यांनी पोस्ट काही वेळातचहटवली असली तरी तिचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. शनिवारीपासून #ArrestAarfaKhanam हा हॅशटॅग X वर अव्वल ट्रेंडमध्ये राहिला असून, २४ तासांत सुमारे ५ लाखांहून अधिक ट्विट्स या विषयावर करण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्याचे वृत्त आहे, मात्र अद्याप कुठल्याही पोलिस ठाण्याने अधिकृत कारवाई केली असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

वाद वाढल्यानंतर आरफा खानम यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे स्पष्टीकरण देत माफी मागितली. त्या म्हणाल्या, “ईदच्या दिवशी मी एक पोस्ट शेअर केली होती. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जर माझ्या पोस्टमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. मी सर्व धर्मांचा आदर करते आणि हे लक्षात येताच ती पोस्ट तात्काळ हटवली.”



तथापि, त्याचबरोबर त्यांनी काही यूजर्सच्या अशा पोस्ट्स रीट्विट केल्या ज्यामध्ये मूळ पोस्ट आक्षेपार्ह नव्हती असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या माफीनंतरही विरोधात आणखी संताप वाढला.

या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मौनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसवर हिंदूविरोधी मानसिकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. काही नेत्यांनी यावरून काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेस अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी खुली भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, या प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, तर देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून याप्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

Congress leader Arfa Khanum in controversy over Eid-ul-Azha post; Demand to register a case for showing Hindu sentiments

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023