Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाला काँगेस नेते राहुल गांधी यांची धमकी!

Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाला काँगेस नेते राहुल गांधी यांची धमकी!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Rahul Gandhi  घटनात्मक आणि स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला काँगेस नेते राहुल गांधी यांनी धमकी दिली आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.Rahul Gandhi

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षानेते राहुल गांधी आणि भारतीय निवडणूक आयोगामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोडून काढले. यानंतर कॉंग्रेसने बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली. यावेळी भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, जर केंद्रात आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आले की, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांवर ‘मत चोरी’ केल्याबद्दल कारवाई केली जाईल.”Rahul Gandhi

गयाजी येथे झालेल्या सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की निवडणूक आयोगाने विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) स्वरूपात एक विशेष पॅकेज आणले आहे. निवडणूक आयोग त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मागत आहे, पण जनता या आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागेल, कारण लवकरच संपूर्ण देशात त्याची चोरी पकडली जाईल.निवडणूक आयोग म्हणतो की एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र द्या, तर ते जबाबदार आहेत. त्यांची चोरी पकडली गेली. ते मला प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगतात. मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो की संपूर्ण देश तुमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागेल. आम्ही प्रत्येक राज्यात, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तुमची चोरी पकडू तसेच देशाला दाखवू. जसे मोदीजी बिहारसाठी विशेष पॅकेजबद्दल बोलतात. तसेच त्यांनी बिहारसाठी एक नवीन विशेष पॅकेज आणले आहे, त्याचे नाव एसआयआर आहे.” असे म्हणत टीका केली.

दरम्यान, राहुल गांधींच्या मत चोरीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून आरोपांची उत्तरे देण्याऐवजी निवडणूक आयुक्तांनी विरोधी पक्षांनाच लक्ष्य केले. त्यावरुन राहुल गांधींनी थेट मोदी, शाहांसह निवडणूक आयुक्तांना आव्हान दिले आहे. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक होत थेट मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याचे संकेत दिले आहेत.

Congress leader Rahul Gandhi threatens the Central Election Commission

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023