विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर ‘गायब’ शीर्षकाची एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. मात्र देशभरातून झालेल्या तीव्र निषेधामुळे काँग्रेसला (Congress) अखेर ही पोस्ट हटवावी लागली.
काँग्रेसने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये “जब जिम्मेदारी का समय आया तो गायब” असे नमूद करत एक चेहरा नसलेला व्यक्ती दाखवला होता, जो देशाच्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून दर्शवला गेला. भाजपने या पोस्टची तुलना ‘सर तन से जुदा’ या हिंसक घोषणा आणि प्रतिमेशी केली आणि काँग्रेसवर थेट पंतप्रधानांविरुद्ध हिंसाचाराला खतपाणी घालण्याचा आरोप केला.
भाजप नेत्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, या वादग्रस्त पोस्टद्वारे काँग्रेसने पाकिस्तानच्या प्रचारयंत्रणेला मदत केली आहे. देशातील मुस्लिम मतपेढीला खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने म्हटले की, काँग्रेसच्या या वागण्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होतो आणि दहशतवाद्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळतो.
याआधीही काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले का, यावर संशय व्यक्त करत बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे वक्तव्यही पाकिस्तानच्या अजेंडाला चालना देणारे असल्याचे भाजपने म्हटले होते.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर सडकून टीका करताना म्हटले, “ही केवळ एक राजकीय टीका नाही. हे मुस्लिम मतपेढीला खूष करण्यासाठी जाणून बुजून टाकलेले चिथावणीखोर संकेत आहेत. काँग्रेसने पुन्हा एकदा देशविरोधी प्रवृत्तींच्या बाजूने उभे राहून नीच राजकारण केले आहे. पण काँग्रेस कितीही षडयंत्र केली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोट्यवधी भारतीयांचा अढळ विश्वास आहे. आज कोण खरंच ‘सर तन से जुदा’ झालं आहे, तर ती काँग्रेस आहे – नेतृत्वहीन, दिशाहीन अवस्थेत फडफडणारी काँग्रेस!”
दरम्यान, भाजप नेते आर. पी. सिंग यांनी राहुल गांधींवर टीका करत ‘पाकिस्तान के यार’ अशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेसोबत एका व्यक्तीला सुरा हातामागे लपवलेला दाखवण्यात आला आहे, ज्याचा अर्थ देशाशी गद्दारी करणारा म्हणून लावण्यात आला आहे.
भाजप नेत्यांनी काँग्रेसला थेट सवाल केला आहे की, “काँग्रेस पाकिस्तानच्या बाजूने आहे का भारताच्या?”
Congress removes ‘missing’ post after heavy criticism; BJP launches strong attack
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती