IIT Gandhinagar आयआयटी गांधीनगरच्या डीपफेथ‘ प्रकल्पावरून वाद; इस्लामिक थीमवर पीएचडी संशोधनामुळे टीका

IIT Gandhinagar आयआयटी गांधीनगरच्या डीपफेथ‘ प्रकल्पावरून वाद; इस्लामिक थीमवर पीएचडी संशोधनामुळे टीका

विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : आयआयटी गांधीनगरमधील ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस (HSS) विभाग सध्या वादात सापडला आहे. या विभागात इस्लाम धर्माशी संबंधित पीएचडी संशोधन प्रकल्प राबवले जात असल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हा प्रकार धार्मिक विचारसरणीला शैक्षणिक संस्थांमध्ये जागा देण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

या प्रकल्पाचे नाव ‘DeepFaith’ असून त्यामध्ये खालील विषयांवर संशोधन सुरू आहे: Fishing With Faith – लक्षद्वीपमधील मुस्लिम समाजामध्ये इस्लामिक श्रद्धा आणि पर्यावरणपूरक मासेमारी यांचा संबंध. Robes of Authority – केरळमधील सुन्नी इस्लामी विद्वान त्यांच्या कपड्यांद्वारे धार्मिक प्रभाव कसा दाखवतात. From Gods to Jinn – केरळमधील पारंपरिक आत्मा आणि भूतांच्या संकल्पना इस्लामनुसार जीनमध्ये कशा रूपांतरित झाल्या?

हा विषय केवळ इतिहासाच्या अभ्यासापुरता मर्यादित नसून इस्लाम धर्माची महती सांगणारा असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. हे विषय केवळ इस्लामचा ऐतिहासिक अभ्यास नसून, धार्मिक विचारसरणीचा उदात्तीकरण असल्याचे आरोप नेटकऱ्यांनी केले आहेत.

या प्रकरणावरून आणखी वाद वाढला, जेव्हा या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रोफेसर निशांत चोक्षी यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर माहिती शेअर केल्यास कारवाईची धमकी दिल्याचा ईमेल समोर आला. चोक्षी म्हणाले की, विभागातील ईमेलचे स्क्रीनशॉट शेअर करणं हे “ऑनर कोड”चे उल्लंघन आहे आणि त्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.HSS विभागाच्या अंतर्गत ईमेलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवले जात आहेत, जे अपमानास्पद व धोकादायक आहे. हे गोपनीयतेचा आणि विश्वासाचा भंग आहे.”

या वादामुळे शिक्षण मंत्रालयाकडे लक्ष वेधले जात असून, सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक विचारसरणीला कितपत स्थान द्यावे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Controversy over IIT Gandhinagar  DeepFaith project; Criticism over PhD research on Islamic theme

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023