विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Robert Vadra हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात झालेल्या जमीन व्यवहार व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि इतर १० आरोपींना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने नोटीस बजावली आहे.Robert Vadra
शनिवारी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायाधीश सुशांत चांगोत्रा यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) युक्तिवादानंतर ही नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.Robert Vadra
ईडीने अलीकडेच न्यायालयात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने ७.५ कोटी रुपयांमध्ये ३ एकर जमीन खरेदी केली आणि तीच जमीन नंतर ५८ कोटी रुपयांना डीएलएफ कंपनीला विकली. ईडीचा आरोप आहे की ही रक्कम गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून वापरली गेली असून, यामध्ये गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
ईडीच्या वतीने विशेष सरकारी वकील नवीन कुमार मट्टा, मोहम्मद फैजान आणि जोहेब हुसेन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात युक्तिवाद सादर केला. त्यांनी कोर्टात स्पष्ट केले की, या व्यवहारासाठी वापरण्यात आलेला चेक कधीच वटवण्यात आला नव्हता आणि स्टॅम्प ड्युटी टाळण्यासाठी रकमेबाबत खोटी माहिती कागदोपत्री नमूद करण्यात आली होती.
एजन्सीने असा दावा केला की, या व्यवहारामध्ये नियमबाह्य पद्धतीने परवाने मंजूर करण्यात आले असून, अर्ज प्रक्रियाही पाळण्यात आलेली नाही. काही साक्षीदारांनी सांगितले की, परवाना मंजुरीसाठी जाणूनबुजून घाई करण्यात आली आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीजचे संचालक सत्यानंद याजी यांचाही या घोटाळ्यात सहभाग होता.
ईडीने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात असे नमूद केले आहे की, स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी ही कंपनी वाड्रा यांच्या ९९% मालकीची आहे आणि त्यांच्या वैयक्तिक भूमिकेव्यतिरिक्त, त्या कंपनीद्वारे अप्रत्यक्षपणे मनी लॉन्ड्रिंग करण्यात आले आहे. ईडीने कलम ७० अंतर्गत कारवाई करत सांगितले की, या व्यवहारात वापरलेले बहुतांश पैसे वाड्रा यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांमार्फत फिरवण्यात आले आहेत.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा, स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, सत्यानंद याजी, केवल सिंग विर्क यांच्यासह एकूण ११ व्यक्ती आणि संस्थांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, जुलै २०२५ पर्यंत मनी लॉन्ड्रिंग सुरू असल्याचेही एजन्सीने नमूद केले आहे.
या प्रकरणावर आता २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे आणि त्याआधी सर्व आरोपींना न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे.
Court notice to Robert Vadra in Gurugram land deal and money laundering case; next hearing on August 28
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान