विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (CPI) सरचिटणीस डी. राजा यांनी आज खुलेपणाने नक्षलवाद्यांच्या बाजूने उभे राहत मोदी सरकारच्या “नक्षल मुक्त भारत” मोहिमेवर जोरदार हल्ला चढवला.
राजा म्हणाले, “सरकारने नक्षलवाद्यांचा शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारलाच पाहिजे. ‘नक्षल मुक्त भारत’ म्हणजे काय? आधी ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ म्हणाले, उद्या ‘कम्युनिस्ट मुक्त भारत’ म्हणतील. BJP-आरएसएस सत्तेत राहिले तर भारताचे भविष्य धोक्यात येईल. संविधान वाचवायचे असेल तर हे सरकार हद्दपार केलेच पाहिजे.”
२८ सप्टेंबर रोजी दिल्लीतील “नक्षल मुक्त भारत : मोदींच्या नेतृत्वाखाली रेड टेररचा अंत” या परिषदेत गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांच्या शस्त्रसंधीच्या मागणीला ठाम नकार दिला. “शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करा. मग सुरक्षा दल एकाही गोळीचा वापर करणार नाही.” CPI (Maoist) ने एक महिन्याच्या शस्त्रसंधीची मागणी करणारे पत्र प्रसिद्ध केले होते.
भाजपने राजांवर “देशद्रोही वक्तव्य” केल्याचा आरोप केला. CPI कार्यकर्त्यांनी मात्र राजांचे समर्थन केले. या वादामुळे देशातील नक्षलवादाचा मुद्दा पुन्हा राजकीय रणांगणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
D Raja’s stand directly in favor of Naxalites, criticism of “Naxal-free India” campaign
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















