विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Udaipur Files राजस्थानमधील उदयपूर येथे 2022 मध्ये घडलेल्या टेलर कनहैयालाल यांच्या निर्घृण हत्या प्रकरणावर आधारित ‘उदयपूर फाईल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी (१० जुलै) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन १२ जुलै रोजी होणार होते. मात्र, जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी आणि पत्रकार प्रशांत टंडन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने हा निर्णय घेतला.Udaipur Files
याचिकाकर्त्यांनी आरोप केला की, हा चित्रपट समाजात धार्मिक तेढ वाढवण्याचे आणि द्वेषपूर्ण भाषण प्रसारित करण्याचे काम करतो. त्यांनी म्हटले की, चित्रपटातील काही दृश्ये अत्यंत संवेदनशील असून, त्यांचा वापर समाजात विघटन निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
पाच तास चाललेल्या सुनावणीत, न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांनी २६ जून रोजी प्रदर्शित केलेल्या टीझरवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या टीझरमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) हटवायला सांगितलेल्या काही अतिशय हिंसक दृश्यांचा समावेश होता. २ जुलै रोजी प्रमाणित केलेल्या अधिकृत ट्रेलरमध्ये ही दृश्ये हटवण्यात आली होती, मात्र टीझर सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाला होता.
CBFC ने या पार्श्वभूमीवर निर्मात्यांना नोटीस बजावली असून, यामुळेच न्यायालयाने निर्मात्यांच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, “हा चित्रपट हा द्वेष पसरविण्याचा अत्यंत निकृष्ट प्रकार असून तो संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट हे माध्यम समाजप्रबोधनासाठी असावे, परंतु येथे त्याचा गैरवापर होत आहे.”
या प्रकरणात न्यायालयाने सरकारकडे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार सोपवले आहेत. केंद्र सरकारने एक आठवड्याच्या आत ठोस निर्णय घ्यावा की, हा चित्रपट सार्वजनिकरित्या प्रदर्शित होऊ शकतो की नाही. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घातली आहे.
उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेनेतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. व्हिडीओ क्लिपमध्ये कथित हल्लेखोर एका व्यक्तीचा शिरच्छेद करत असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. त्यात नुपूर शर्मा यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. कन्हैया याने नुपूर शर्मा यांची स्तुती करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे बोलले जात आहे.
‘द केरल स्टोरी’ आणि ‘कश्मीर फाईल्स’नंतर ‘उदयपूर फाईल्स’ हा आणखी एक वादग्रस्त चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. या चित्रपटांवर अनेकदा आरोप झाले आहेत की, ते एकाच विशिष्ट धर्म किंवा समाजाविरोधात भूमिका घेतात आणि त्यामुळे देशात धार्मिक तेढ निर्माण होतो.
Delhi High Court stays release of ‘Udaipur Files’; orders central government to take decision
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार