विशेष प्रतिनिधी
पुणे : राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीतील आले होते. जातीत द्वेष निर्माण करण्याचं त्याचं काम आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राहुल गांधी यांनी आज परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले होते.या सर्व प्रकरणाची न्यायालीन चौकशी करत आहोत. मारहाणीमुळे मृत्यू झालाय असं समोर आलं तर कोणालाही सोडले जाणार नाही. शरद पवारांनी मला या प्रकरणात लक्ष घाला असं सांगितलं आहे.
फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 6.50 लाख घर मंजूर केली होती. अतिरिक्त 13 लाख घर मंजूर करण्यात आलेय. एका वर्षात 20 लाख घर गरिबांना भेटणार आहेत. देशात कोणत्याच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घर भेटली नाही उरलेल्या लोकांना पुढच्या वर्षी घर मिळतील.यासाठी निकष देखील बदलण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
आता सर्वाना येत्या 5 वर्षात मिळणार घरे मिळणार आहेत. मी महाराष्ट्राच्या वतीने प्रधानमंत्री यांचे आभार मानतो चित्ररथ वादाबाबत ते म्हणाले, त्या बद्दल आशिष शेलार बोलले आहेत. महाराष्ट्राला डावलल जातेय असं काय नाहीये. त्याचं रोटेशन असतं.. तरीही आम्ही पुन्हा विनंती करू
छगन भुजबळ यांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले.
भुजबळ मला भेटले. त्यांनी सांगितलं आमचं काय बोलणं झालेय. ते आमचे नेते आहेत. अजित पवार देखील त्यांची चिंता करतात.अजित पवार यांना त्यांचा पक्ष राष्ट्रीय करायचा आहे. त्यामुळे भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवाचं आहे असं बोलणं झालं होतं.भुजबळ आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.
Devendra Fadnavis attacked Rahul Gandhi for political purposes, creating hatred in caste
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा