विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याच्या वल्गना केल्या आहेत. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना ट्रम्प म्हणाले, “जगात सुरू असलेली सात युद्धे थांबवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची होती, पण ती सर्व युद्धे मी थांबवली.”Donald Trump
सुमारे 15 मिनिटांचा वेळ असताना 55 मिनिटे लांबलेल्या कंटाळवाण्या भाषणात ट्रम्प यांनी ही वल्गना केली. आतापर्यंत अनेकदा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्ध आपण थांबविण्याचा दावा केला आहे. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरित, अमेरिकेची आर्थिक परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध आणि कार्बन फूटप्रिंट यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.Donald Trump
ट्रम्प म्हणाले, मी ७ युद्धे थांबवली. मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. माझे ध्येय बक्षिसे नाही, तर जीव वाचवणे आहे. संयुक्त राष्ट्रांनी युद्ध थांबवण्याचे काम केले नाही. मी ते थांबवले, तर त्याऐवजी ते निधी देत होते.
बेकायदेशीर स्थलांतरितांची वाढती संख्या युरोपला गंभीर संकटात टाकत आहे. बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांना शिक्षा होत आहे. त्यानंतर, बेकायदेशीर प्रवेश थांबला, असे सांगून ट्रम्प म्हणाले, एकतर्फी मान्यता हमासला बक्षीस देण्यासारखे आहे. हे थांबवले पाहिजे.
युरोप रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करत आहे, तर त्यांचे खरे युद्ध रशियाशी आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला निधी देत आहेत, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.
Donald Trump again claims to have stopped the war between India and Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















