विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पलटी मारली आहे. आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढत आहे, म्हणून आम्ही समस्या सोडवण्यास मदत केली आहे. मी असं म्हणत नाही की, मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवण्यास मदत केली.
डोनाल्ड ट्रम्प व्यापाराबाबतच्या त्यांच्या विधानावर मात्र ठाम राहिले. मी व्यापाराबद्दल बोललो तेव्हाच प्रकरण मिटलं असे सांगताना ते म्हणाले, गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती खूप धोकादायक होत चालली होती. दोन्ही देशांनी अचानक क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली आणि आम्ही सर्व काही सेटल केलं भारत आणि पाकिस्तान वर्षानुवर्षे भांडत आहेत. मला वाटलं होतं की, मी काहीतरी मार्ग काढू शकतो आणि मी तसं केलं. तुम्ही किती काळ भांडत राहू शकता? मला खात्री नव्हती की, दोघेही काहीतरी तडजोड करतील. हे खूप कठीण होतं. खरोखरच नियंत्रणाबाहेर जाणार होतं.
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा याचं श्रेय स्वतःला घेतलं. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. \”भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे\” असं पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अमेरिकेसोबतच्या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असंही भारताने स्पष्ट केलं.
Donald Trump U-turn on ceasefire between India and Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?