विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : MLA K. C. Virendra बेकायदेशीर सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर मोठा घाव घालत, अंमलबजावणी संचालनालयाच्या बेंगळुरू येथील पथकांनी (ED) 22 व 23 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील 31 ठिकाणी छापे टाकले. यात गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बंगळुरू, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा येथील विविध ठिकाणांचा समावेश होता.MLA K. C. Virendra
कर्नाटकमधील चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र उर्फ पप्पी यांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. ईडीला त्यांच्या घरातून आणि इतर ठिकाणांवरून इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड, परकीय चलन, तसेच सोने-चांदी मिळाले की मोजणी करणाऱ्या मशीनाही थकून गेल्या.MLA K. C. Virendra
ही कारवाई चित्रदुर्ग जिल्ह्याचे आमदार के. सी. वीरेंद्र व इतरांविरोधात दाखल झालेल्या बेकायदेशीर ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरणात करण्यात आली. या धाडीमध्ये ईडीने सुमारे 12 कोटी रुपये रोख 1 कोटी परकीय चलन), सुमारे 6 कोटींचे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे साहित्य, मालमत्तेची कागदपत्रे, चार मोटारी जप्त करण्यात आल्या असून 17 बँक खाती व दोन लॉकर गोठवण्यात आले आहेत.
या धाडीत गोव्यामधील पाच कॅसिनो – पपी’ज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपी’ज कॅसिनो प्राईड, ओशन 7 कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनो यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून ते सट्टेबाजी व मनी लॉन्ड्रिंग रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय आहे.
23 ऑगस्ट रोजी आमदार के. सी. वीरेंद्र यांना गंगटोक येथे अटक करण्यात आली. त्यांना गंगटोक (सिक्कीम) येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना बंगळुरू येथील अधिकार क्षेत्रातील न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रांझिट रिमांड मिळवण्यात आला.
ईडीच्या माहितीनुसार, वीरेंद्र आपल्या सहकाऱ्यांसह सिक्कीमला गेले होते, जिथे ते एका कॅसिनोसाठी जमीन लीजवर घेण्याच्या प्रक्रियेत होते. अखेर ईडीने त्यांना अटक केली आहे.
ED’s big raid: Action against illegal betting racket, Karnataka Congress MLA K. C. Virendra arrested
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार