विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष तीव्र पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) सुरू असताना मतदार याद्यांमध्ये गडबड केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत, पवन खेडा, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि इतर नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने (ECI) गुरुवारी, १७ जुलै रोजी हे सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
पत्रकार आणि युट्युबर अजीत अंजुमच्या एका व्हिडिओचा आधार घेऊन त्यांनी हे आरोप केले होते. या व्हिडिओमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मतदारांच्या वतीने फॉर्मवर सही करत असल्याचे दाखवले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काँग्रेस आणि RJD नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आणि दावा केला की, सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी मतदार यादी बदलली जात आहे.
राहुल गांधी यांनी X या माध्यमावरून निवडणूक आयोगावर थेट आरोप करत म्हटले की, ‘SIR’च्या नावाखाली मतं चोरली जात आहेत आणि आयोग रंगेहाथ पकडला गेला आहे.
पण निवडणूक आयोगाने या आरोपांवर तत्काळ प्रतिक्रिया देत म्हटले की, संबंधित व्हिडिओमध्ये करण्यात आलेले दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. आयोगाने यासंदर्भात सविस्तर चौकशी केली असून ती सार्वजनिक केली आहे. यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असा स्पष्ट निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
पाटणा जिल्हा प्रशासनानेही अधिकृत निवेदन आणि दस्तऐवज सादर करून अजीत अंजुमच्या व्हिडिओतील दावे खोडून काढले आहेत. अधिकारी मतदारांच्या वतीने फॉर्म भरत असल्याचा दावा खोटा ठरवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त विकास आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने संबंधित बूथ क्रमांक २२६, २२४, २५७, २५ आणि २६० वर तपास केला.
चौकशीत असे स्पष्ट झाले की अधिकारी केवळ ‘मृत’ किंवा ‘स्थानांतरित’ मतदारांबाबतचे फॉर्म भरत होते, जे कायदेशीरदृष्ट्या नियमांनुसार परवानगी असलेली कार्यपद्धती आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही जिवंत आणि सक्रिय मतदारांच्या वतीने फॉर्म भरलेले नाहीत.
व्हिडिओमध्ये दिसणारी महिला अधिकारी कवीता कुमारी असून त्या दरभंगा येथील बूथ क्र. १५६ साठी अधिकृत अधिकारी आहेत. चौकशीनंतर स्पष्ट झाले की त्या फक्त मतदार पडताळणीसाठी अधिकृत काम करत होत्या. त्यांच्या क्षेत्रातील ८७८ पैकी ७२५ नोंदी आधीच अपलोड झालेल्या होत्या.
प्रशासनाने स्पष्ट केलं की, व्हिडिओमध्ये दाखवलेली यादी आधीच डिजिटल स्वरूपात आयोगाच्या प्रणालीवर अपलोड झालेली होती. त्यामुळे त्यानंतर कोणतीही गडबड झाल्याचा प्रश्नच येत नाही. BLO अधिकाऱ्यांचे कार्य नियमित नियमांनुसारच होते आणि त्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण करण्यात आले होते.
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला की अशा प्रकारच्या अर्धसत्य, तथ्यहीन आणि अप्रमाणित माहितीचा प्रसार केल्यास निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. माध्यमसंस्था, पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत, कुठल्याही व्हिडिओ किंवा घटनेच्या आधी पूर्ण सत्यता तपासूनच मते मांडावीत, असे सुचवले आहे.
Election Commission rejects Rahul Gandhi, Tejashwi Yadav’s claims of tampering with voter lists, Ajit Anjum’s video fake
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला