विशेष प्रतिनिधी
गोंदिया :Naxalites गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे हॉकफोर्स, पोलिस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल महिला नलक्षवादींसह चौघांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत ठार झालेल्या तीनही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आले आहे, त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे बक्षीस होते.Naxalites
मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात त्यांच्यावर नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर), शीला, रंजीता, लख्खे, कान्हा भोरमदेव यांचा समावेश होता. या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या तीनही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे.
या चकमकीची माहिती देताना पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले की, गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ ही चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले. काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स, पोलिस विभागाच्या 12 पथकातील जवळपास 500 जवानांचा समावेश होता.
पोलीस आणि हॉक फोर्स जवानांनी रौंदा येथील जंगलात शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीदरम्यान एक इंसास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल व्यतिरिक्त अनेक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
जंगलातील चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जखमी झाले. या घनदाट जंगलाचा फायदा उचलून काही नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी या सर्च ऑपरेशनमध्ये हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोबरा कमांडो आणि इतर पथकांचा सहभाग नोंदवला. एकूण १२ हून अधिक पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं.
Encounter between police personnel and Naxalites, four Naxalite women killed
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा