विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : General Asim Munir भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान-उम-मरसूस’ नावाने राबविलेल्या महिलेला यश मिळाल्याचा दावा केला आहे. या खोटेपणा जणू प्रमोशन ( पदोन्नती ) देत पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर पदोन्नती दिली आहे. १९५९ नंतर पहिल्यांदाच पाकमध्ये एखाद्या लष्करी अधिकाऱ्याला हे सर्वोच्च सैनिकी पद देण्यात आले आहे.General Asim Munir
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पाकिस्तान सरकारकडून अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि शत्रूविरुद्ध निर्णायक लढा देण्यासाठी दाखवलेल्या धाडसी नेतृत्वामुळे जनरल असीम मुनीर यांना हे पद दिले जात आहे.
शरीफ यांनी संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन करत म्हटले की, “असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाक लष्कराने अत्यंत शौर्याने आणि निर्धाराने लढा दिला. त्यांच्या युद्धनीतीमुळे आणि सशस्त्र दलांमध्ये समन्वयामुळे पाकिस्तानने आपली सार्वभौमत्व आणि भू-एकात्मता टिकवून ठेवली.”
जनरल मुनीर हे नोव्हेंबर २०२२ मध्ये लष्करप्रमुखपदी नियुक्त झाले होते, आणि मूळतः त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये वाढ करून तो पाच वर्षांचा करण्यात आला आहे. आता ते नोव्हेंबर २०२७ पर्यंत लष्करप्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहेत.
या निर्णयानंतर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचीही भेट घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आले. झरदारी यांनी म्हटले की, “जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने मातृभूमीचे यशस्वी रक्षण केले असून ते या पदोन्नतीस पात्र आहेत.”
भारताने ७ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत लक्ष्य साधले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवसांपर्यंत ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि अन्य दीर्घ पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून कारवाई झाली. १० मे रोजी दोन्ही देशांनी परस्पर लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला.
जनरल मुनीर यांनी आपल्या पदोन्नतीचं श्रेय संपूर्ण पाक लष्कराला दिलं असून, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
वास्तविक भारताने पाकिस्तानला मोठा दणका दिला होता. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हल्ले अयशस्वी केले. भारताच्या ऑपरेशन सिंदरूने पाकिस्तानातील तसेच पीओकेतील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. पाकिस्तान या सर्व परिस्थितीत एक पाऊल मागे गेला. पराभवाच्या भीतीने पाकिस्तानच्या डीजीएमओने अगोदर भारताला कॉल केला. यातून पाकिस्तानची हतबलता आणि भारताची ताकद दिसून आली होती. तरीही पाकिस्तान विजयाचे दावे करत असून जनरल असीम मुनीर यांना विजयाचा शिल्पकार ठरवीत आहे.
False promotion, Pakistan’s General Asim Munir gets the rank of Field Marshal
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर