विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. न्यायालयाकडे सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्याबाबत 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, प्रमाणपत्र मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ शकतो. Yogi Adityanath
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असून सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. याप्रकरणी, दाखल याचिकेतील सुनावणीत सेन्सॉर बोर्डाने पुढील 2 दिवसांत निर्णय घेऊ असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे, लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्यानंतर निर्मात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी, सेंटर बोर्डाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र मागितल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला होता. त्यामुळे, याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं. त्यानंतर, 2 दिवसांत प्रमाणपत्र देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय घेऊ, असे सेन्सॉर बोर्डाने न्यायालयापुढे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट (Cinema) दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. अभिनेता विवेक ओबेरायने या चित्रपटात नरेंद मोदींनी भूमिका साकारली होती, पंतप्रधानाच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संपूर्ण प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला होता. आता योगी आदित्यनाथ यांच्या जीवनाचा प्रवास उलगडणार आहे.
Film based on Yogi Adityanath’s life under scrutiny by censor board
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला