विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य आणि शौर्य दाखवून एक नवा इतिहास रचला आहे. सैन्याने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने काम केले आहे. निश्चित केलेले टार्गेट उद्ध्वस्त करण्यात सैन्याला यश आले आहे. आम्ही कोणत्याही नागरी स्थानांवर हल्ला न करता मानवता आणि सतर्कता दाखवली आहे. आम्ही भगवान हनुमान यांच्या आदर्शाचे पालन केले आहे. जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना केले होते. आम्ही फक्त त्यांनाच मारले आहे, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारले होते, असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. सुमारे पहाटे १.०५ ते १.३० या वेळेत हे हल्ले करण्यात आले.
ऑपरेशननंतर परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्याकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी कारवाईबाबत माहिती देताना सांगितले की, भारतीय गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानकडून पुन्हा हल्ल्याची शक्यता असल्याचे इनपुट्स मिळाले होते. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करताना म्हटले की, “भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य, अचूकता आणि संवेदनशीलतेने काम करत दहशतवाद्यांच्या तळांना नेमके लक्ष्य करत नवा इतिहास रचला आहे. कोणत्याही नागरी भागाला धक्का न लावता केवळ दहशतवादी केंद्रांवर हल्ला करून आम्ही मानवतेचा आदर्श ठेवला आहे.”
यावेळी राजनाथ सिंह यांनी प्रभू श्रीरामाचे उदाहरण देत म्हटले की, “जसे भगवान हनुमानांनी अशोक वाटिकेचा नाश करताना केवळ दोषींना धडा शिकवला, तसेच आमचे सैन्य फक्त त्यांनाच लक्ष्य करत आहे, ज्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांवर हल्ला केला होता.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, असे सांगत राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, “भारताच्या भूमीवर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. ही कारवाई खूप विचारपूर्वक आणि केवळ दहशतवाद्यांवर केंद्रित होती. त्यांच्या मनोबलाचा खच करणे हेच आमचे ध्येय होते.” त्यांनी सैन्याच्या पराक्रमाला पुन्हा एकदा नमन केले.
भारताने बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरिदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाह या नऊ ठिकाणांवर एकत्रित हवाई हल्ला केला. हे सर्व ठिकाणे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि तळ असल्याचे खात्रीशीर इनपुट्स भारताकडे होते.
Following the ideals of Lord Hanuman, praised by Defense Minister Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत