विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Charanjit singh channi पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइक करून भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. मात्रकाँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी बालाकोट एअर स्ट्राईकबाबत संशय व्यक्त करत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. Charanjit singh channi
पहलकाम हल्ल्यानंतर पाकिस्तान भारत काय पावले उचलणार यामुळे जास्तीत आहे. बालाकोट एअर स्ट्राइकच्या आठवणी अजूनही पाकिस्तानच्या मनात आहेत. त्या आठवणींनीच पाकिस्तानचे मनोबल पूर्णपणे खचलेले आहे. अशा वेळी चरणजीत सिंग चन्नी म्हणाले, देशात कुणीही सर्जिकल स्ट्राईक पाहिलं नाही. आपल्या देशात जर बॉम्ब पडला तर आपल्याला समजेल, मग पाकिस्तानात मारल्याचा दावा करत आहेत, तर त्याचा पुरावा कुठे आहे?”
पाहायला किंवा समजायला काहीच नव्हते, असे सांगत चन्नींनी मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र त्यांनी यापलीकडे जाऊन जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही सरकारवर कडक टीका केली.
“ही मौन बाळगण्याची वेळ नाही. ही जखम भरून काढण्याची वेळ आहे, वाढवण्याची नव्हे,” असे सांगत चन्नींनी हल्लेखोरांना तत्काळ शोधून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून ही मोठी सुरक्षा यंत्रणेची चूक असल्याचे त्यांनी म्हटले.
“काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवाईला सरकारला पूर्ण पाठिंबा देतो. पण या पाठिंब्यासोबत सरकारची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे,” असे चन्नींनी स्पष्ट केले.
तसेच, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना केवळ सांत्वन नव्हे, तर भरपाई व पुनर्वसन मिळायला हवे, असेही त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी करताना सांगितले.
एका बाजूला राहुल गांधी यांच्यापासून काँग्रेसचे नेते मोदी सरकारला कोणत्याही कारवाईसाठी आमचे समर्थन आहे असे म्हणत असताना चरणजीत सिंग चन्नी यांनी बालाकोट हेअर स्टाईल पर संशय व्यक्त करून लष्कराच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला आहे.
Former Congress Chief Minister’s question, Did anyone see the Balakot air strike?
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती