विशेष प्रतिनिधी
लखनऊ : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा गांधी कुटुंबच अधिक वेदनेत दिसत आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रविवारी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केला आहे. Rahul Gandhi
मौर्य यांनी ‘X’ या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकसभेतील कमकुवत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भारताची कमी आणि पाकिस्तानची अधिक काळजी आहे. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा गांधी कुटुंबच जास्त ओरडताना दिसत आहे. पाकिस्तानची खुशामद करण्यासाठी काँग्रेस सातत्याने भारतीय लष्कराला अपमानित करत आहे.” Rahul Gandhi
मौर्य म्हणाले, “सत्तेतून हद्दपार झाल्यामुळे काँग्रेसचे भान हरपले आहे. त्यामुळे आता अशा गोंधळलेल्या नेत्यांच्या मागे लपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, जे स्वतःच्या विधानांवरही ठाम राहत नाहीत. त्यांच्या गांधीप्रमाणेच अशाश्वत आणि दिशाहीन वृत्तीचे नेतृत्व आहे.”
राहुल गांधींनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान संदर्भातील दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करत मौर्य म्हणाले की, “सत्य हे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे केवळ पाकिस्तानच नव्हे, तर स्वतःला अजेय समजणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांचाही अहंकार खिळखिळा झाला आहे.”
Gandhi family is suffering more than Pakistan due to the impact of Operation Sindoor, BJP hits out at Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार