विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात सक्तीच्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठी धर्मांतर विरोधी (अँटी कन्व्हर्जन) कायदा आणण्याची गरज असल्याचे विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभा पावसाळी अधिवेशनात भाजपचे प्रमेन्द्र शेट आणि आम आदमी पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या अनुषंगाने हा मुद्दा समोर आला. Pramod Sawant
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “उत्तर प्रदेशात सक्तीच्या धर्मांतरांवर बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आहे. अनेक राज्यांनी असे कायदे केले आहेत. आता गोव्यातही असा कायदा येणे आवश्यक आहे.” त्यांनी काँग्रेससह सर्व पक्षांच्या आमदारांना या कायद्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी गोव्यातून अटक केलेल्या एस. बी. कृष्णा या महिलेच्या प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले. कृष्णा ऊर्फ आयेशा ऊर्फ निक्की हिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. दोन तरुणींना फसवून लग्नासाठी पळवून नेल्याच्या संशयावरून यूपी पोलिसांनी तिला अटक केली. तपासात तिचे कनेक्शन आईएसआयएस-प्रेरित धर्मांतर रॅकेटशी तसेच पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांशी असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत सांगितले, आंतरधर्मीय विवाह (इंटर-रिलीजन) होत आहेत, त्यावर आक्षेप नाही. पण पैसे, फसवणूक अथवा दबाव टाकून धर्मांतर केल्यास ते रोखणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या धर्मांतरांना आळा बसण्यासाठी कायद्याची गरज आहे.”
या प्रकरणावर आमदार क्रूझ सिल्वा यांनी गोव्यातील यंत्रणांच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. नुकतीच जुना गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांची प्रदर्शनी झाली, लाखो लोक आले. पण त्याचवेळी इसीस शी संबंधित आरोपी महिला गोव्यात राहत होती, याची माहिती गोवा पोलीस व क्राइम ब्रँचकडे नव्हती, हे आश्चर्यकारक आहे,” असे सिल्वा म्हणाले.
सावंत यांनी स्पष्ट केले की, “गोव्यातील धार्मिक सलोखा अबाधित राहावा, हे आमचे प्रयत्न आहेत. आमचा विरोध कोणत्याही धर्माला नाही, परंतु जाणीवपूर्वक, आर्थिक प्रलोभन देऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे थांबवले पाहिजे. लव्ह जिहादचे प्रकार गोव्यात घडत आहेत हेही आम्ही लक्षात घेतले आहे.”
Goa will come up with a law against forced conversion, Chief Minister Pramod Sawant announced in the Legislative Assembly.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला