विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने तुर्कीविरोधात मोठे पाऊल उचलत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे.
भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवणाऱ्या सेलेबी या कंपनीला २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली मंजुरी आता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ब्युरो ऑफ एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने दिली. ही कारवाई थेट विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
सेलेबी कंपनी भारतातील मुंबई, कोची, तिरुचिरापल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, चेन्नई अशा नऊ प्रमुख विमानतळांवर बॅगेज हँडलिंग, रॅम्प सर्व्हिस आणि कार्गो हँडलिंग सेवा देत होती. मात्र, यापुढे या कंपनीला भारतातील कोणत्याही विमानतळावर कार्य करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
याआधी, तुर्कीच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय नागरिकांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. तसेच तुर्कीमध्ये जाण्याची योजना आखलेल्या सुमारे ६०% भारतीय पर्यटकांनी आपली बुकिंग्स रद्द केली होती. आता सरकारनेही या निषेधात प्रत्यक्ष भाग घेत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे.
भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान दाेन देश भारतीयांच्या रडावर आले आहेत. त्यांनी पाकिस्तानला या लढाईत मदत केली. एक आपला शेजारी चीन तर दुसरा तुर्कस्थान आहे.तुर्कीमधून अनेक वस्तू भारतात आयात केल्या जातात. पण, तुर्कीने शत्रूला मदत केल्याने आता बायकॉट तुर्की मोहिम सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेया मोहिमेचा परिणाम भारतात लगेच दिसून येत आहे. अनेक ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनी तुर्कीसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग थांबवले आहेत. पण प्रकरण इथेच थांबले नाही. भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्थानातून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. परिणामी, तुर्की सफरचंद आता बाजारातून जवळजवळ गायब झाले आहेत
Government also hits back after boycott; Turkish company Celebi security clearance revoked
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?