विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील कोणत्याही विषयावर सोशल मीडियावर मत व्यक्त करून राज्य पातळीवरील नेता बनण्याचा प्रयत्न सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच सुनावले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते की आम्ही राजकीय पक्ष फोडतो तसे तुम्ही शाळा चालविण्यासाठी विद्यार्थी फोडा. वास्तविक मराठी आणि सरकारी शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे त्यांचे आवाहन होते. जिल्हा परिषदेतील कमी विद्यार्थीसंख्येवर भाष्य करताना ते बोलत होते.
मात्र गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. र अपूर्ण बुद्धीचं पोट्ट म्हणतं गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही तुम्ही ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटते आहे? विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. जेणेकरून शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पोट्ट आहेत. त्यांना जिल्हा परिषदेची शाळा काय कळते? त्यांनी माझं पूर्ण भाषण ऐकलं नाही. कारण ते अपूर्ण बुद्धीचे माणूस आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी आधी माझं भाषण तपासून घ्यावे.
Gulabrao Patil counterattack on Rohit Pawar’s criticism
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका



















