विशेष प्रतिनिधी
मुंबई : पत्रकार परिषद हा निवडणूक आयोगाचा केविलवाणा प्रयत्न होता. त्यांनी भाजपने दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवली, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. Harshvardhan Sapkal
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या ‘मतांच्या चोरी’च्या आरोपांनंतर आज आयोगाने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत आणि लोकांची दिशाभूल करणे हे संविधानाचा अपमान आहे,’ असे म्हणत आयोगाने ‘राजकारण बंद करा’ असा इशारा दिला.
मात्र, निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर पलटवार करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगानं आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. पण ही पत्रकार परिषद म्हणजे एक केविलवाणा प्रयत्न होता. आयोगाने आकडेवारीवर बोलायला पाहिजे होते, पण त्यांनी तसे केले नाही. रविवारच्या दिवशी पत्रकार परिषद घेण्याची आयोगाला एवढी घाई का होती? आयोगाने इज्जतीची लक्तरे टांगली आहेत.
राहुल गांधी यांनी मतांची चोरी चव्हाट्यावर आणली आहे. आयोगाने भाजपने दिलेली स्क्रीप्ट खाली मान घालून वाचली. पत्रकार परिषदेमधून आयोगाने नाटक आणि देखावा केला आहे. आज पुन्हा एकदा ते तोंडघशी पडले आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आयोगाला आज कोणीतरी सांगितले असेल की आज राहुल गांधी यांची बिहारमध्ये यात्रा आहे, ती थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी वस्तुनिष्ठ उत्तर दिले नाही, त्यामुळे मतांची चोरी झाली हे सिद्ध झाले, असा दावा सपळाळ यांनी केला. राहुल गांधी यांनी मतांची चोरी केल्याचा आरोप हा पुराव्यानिशी केला. ही सगळी माहिती निवडणूक आयोगाच्या दस्तावेजामधील आहे, असेही त्यांनी सांगितले.
Harshvardhan Sapkal accuses Election Commission of reading script given by BJP
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला