विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या मस्तकावर वार झाला, तर आम्ही छातीवर घाव घालू,असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेली लष्करी कारवाई ही केवळ सीमा पार दहशतवादी तळांवर केलेली कारवाई नसून, शत्रूच्या भूमीवर खोल घाव घालणारी आणि त्यांच्या मुळावर प्रहार करणारी रणनीती होती, असे त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत आता केवळ रक्षण करणारा देश नाही. गरज पडल्यास निर्णायक आणि कठोर कारवाई करण्यास सज्ज आहे. शांततेचा पुरस्कर्ता असलेल्या भारताच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत.
आपल्या भाषणात त्यांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत, भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, मी केवळ संरक्षण मंत्री नाही, तर देशाचा नागरिक आणि जवानांपर्यंत जनतेचा संदेश पोहोचवणारा डाकिया आहे.
काश्मीरमधील जनतेने दहशतवादाविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले. “आज काश्मीरमधील लोकांचा दहशतवादाविरुद्धचा संताप स्पष्टपणे दिसतो आहे, आणि ही मानसिकता देशासाठी महत्त्वाची आहे.
पाकिस्तानच्या संदर्भात बोलताना, त्यांनी पुन्हा एकदा जुन्या इतिहासाची आठवण करून दिली. “२० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पाकिस्तानने दहशतवाद थांबवण्याची हमी दिली होती, मात्र त्यांनी विश्वासघात केला. आज परिस्थिती अशी आहे की चर्चा दहशतवादावर नाही, तर पाकव्याप्त काश्मीरवरच होईल,.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान उद्धृत करत, सिंह म्हणाले, “कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्धासारखाच मानला जाईल.”
पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर टीका करत, त्यांनी सांगितले, “पाकिस्तान जिथे उभा राहतो, तिथेच कर्ज मागणाऱ्यांची रांग लागते. आयएमएफकडून सतत कर्ज मागणे हेच त्यांच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक आहे.
रामचरितमानसचा दाखला देत, त्यांनी सांगितले, “जहां सुमति तहं संपति नाना, जहां कुमति तहं विपत निधाना” — चांगल्या विचारांमुळे समृद्धी येते आणि वाईट विचार देशाला संकटात टाकतात, असे स्पष्ट करत त्यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
If India attacks on its head, it will be retaliated on its chest, warns Defence Minister Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?