विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद :Ahmedabad गुजरात राज्यातील प्रमुख शहर असलेल्या अहमदाबाद शहरात लागलेल्या पोस्टरने नव्या वादाला तोंड फुटले आहे. बलात्कार होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर घरीच थांबा, या आशयाचे पोस्टर्स गुजरातच्या अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात पोस्टर्स लावली आहेत.Ahmedabad
न बलात्कार टाळायचा असेल तर घरी थांबवण्याचा सल्ला काही पोस्टर्सच्या माध्यमातू महिलांना दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका. तुमच्यासोबत बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. आपल्या मित्रांसोबत अंधारात किंवा निर्जनस्थळी जाऊ नका. तिथे तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर? असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स शहरातील चांदलोडिया क्षेत्रातील रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आली होती. मात्र, या पोस्टर्सवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर वाहतूक विभागावर टीका होऊ लागली. त्यानंतर ही पोस्टर्स काढण्यात आली.Ahmedabad
वाहतूक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एकही पोस्टर्स लावले नाही. पोलिसांनी लावलेली पोस्टर्स केवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात असल्याचा दावा पोलिस उपायुक्त (पश्चिम वाहतूक) नीता देसाई यांनी केला आहे. ‘सतर्कता ग्रुप’ या एका स्वयंसेवी संस्थेने वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स लावली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. आपने म्हटले की, राज्यात रोज ५ पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. या पोस्टर्समधून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होते. गुजरातमधील महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये का? असेही आपने विचारले आहे.
“If You Want to Avoid Rape, Stay at Home” — Controversial Poster in Ahmedabad Sparks Outrage
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान