Union Home Ministry : केंद्रीय गृह मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय, गृहमंत्रालयाला मराठीतून आलेल्या पत्रांना उत्तर मराठीतूनच

Union Home Ministry : केंद्रीय गृह मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय, गृहमंत्रालयाला मराठीतून आलेल्या पत्रांना उत्तर मराठीतूनच

Union Home Ministry

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Union Home Ministry  हिंदीवरून महाराष्ट्रासारख्या राज्यात वाद उफाळून आला असताना आता केंद्रीय गृह मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गृहमंत्रालयाला मराठीतून आलेल्या पत्रांना उत्तर मराठीतूनच देण्यात येईल. तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिलं जाईल. हा निर्णय केवळ मराठीसाठीच नव्हे तर देशातील सर्वच प्रादेशिक भाषांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.Union Home Ministry

संसदीय राजभाषा समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईतील राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. दिनेश वर्मा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात देशभरातील विविध राज्यांचे नऊ खासदार सहभागी होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. वर्मा यांनी मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली.

या बैठकीदरम्यान निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले की, संसदीय राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देताना हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहे. हे भाषिक समावेशकतेचं एक सकारात्मक पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलं.

राज्यपाल राधाकृष्णन यांचा अनुभवही ठळक

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी आपले वैयक्तिक अनुभव सांगत भाषांबाबत संवेदनशील दृष्टिकोन मांडला. त्यांनी सांगितलं, “मी झारखंडचा राज्यपाल असताना हिंदी ही संवादाची एकमेव प्रभावी भाषा होती. आज मी ती पूर्णपणे समजतो.” त्यांनी असंही स्पष्ट केलं की, “तामिळनाडूमध्ये पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळले आहेत. या शाळांमध्ये हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी उत्तम हिंदी बोलू शकतात.”

यासोबतच त्यांनी राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून दिलेल्या निर्देशांची माहिती देताना सांगितले की, “विद्यापीठांनी जर्मन, जपानी आणि मँडरिनसारख्या आंतरराष्ट्रीय भाषा शिकवण्याचीही तयारी ठेवावी.”

संसदीय समितीत कोण-कोण सहभागी?

या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या संसदीय समितीतील सदस्यांमध्ये खा. रामचंद्र जांगडा (हरियाणा), खा. राजेश वर्मा (बिहार), खा. कृतिदेवी देवबर्मन (त्रिपुरा), खा. किशोरीलाल शर्मा (उत्तर प्रदेश), खा. सतपाल ब्रह्मचारी (हरियाणा), खा. डॉ. अजित गोपछडे (महाराष्ट्र), खा. विश्वेश्वर हेगडे (कर्नाटक) यांचा समावेश होता. यासोबतच संबंधित वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Important decision of the Union Home Ministry, letters received in Marathi to the Home Ministry will be replied in Marathi only

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023