विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुब्रमण्यम यांनी ही मोठी घोषणा केली आहे. सुब्रमण्यम यांनी नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
सुब्रमण्यम यांनी जागतिक नाणेनिधीच्या आकड्यांचा आधार घेत चौथ्या अर्थव्यवस्थेचा मैलाचा दगड रोवल्याची माहिती दिली. नाणेनिधी आकडेवारी नुसार, भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा पण मोठी झाली आहे. आता अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारताच्या पुढे आहेत. जर भारत नियोजनाप्रमाणे घौडदौड करत राहिला तर येत्या 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीला मागे टाकत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. भारतासाठी आता मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे.
सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. जर आपण योजनेनुसार काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असे मत त्यांनी यावेळी मांडले आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था केवळ चीनलाच नव्हे तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकेल. यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानावर असेल. Largest Economy
India becomes the world’s fourth largest economy, overtaking Japan
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित